धाराशिव / प्रतिनिधी-

  महिला दिनाचे औचित्य साधुन बाभळगांव येथिल नरेंद्र स्वामी महिला बचत गटास आयसीआयसीआय फाउंडेशन मार्फत डाळ मिल,भरडा मशीन व पीठाची गिरणी देण्यात आली. या डाळ मीलचे प्रकल्पाचे उद्घाटन  बाभळगांव ग्रामपंचायतच्या सरपंच सुजाता वाघमारे व उपसरपंच विजयश्री वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जागतिक महिला दिन निमीत्त ग्रामपंचायत बाभळगांवच्या वतीने श्री मेसाई देवी मंदीर येथे कार्यक्रमाचे आयोजन करुन गावातील विशेष कामगीरी बजावणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यात बचत गटाचे काम पाहणाऱ्या महिला, शिक्षिका, जेष्ठ नागरीक महिला, शेती व व्यावसाय करुन कुटुंबाच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या महिलांचा समावेश होता.

        प्रसंगी बोलताना सुजाता वाघमारे यांनी   खेडोपाडीही अनेक कर्तृत्वसंपन्न स्त्रीया आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन व थोडीशी आर्थिक मदत मिळाली तर उद्योग यशस्वी करण्याची क्षमता बाळगतात. आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन गावातील महिलांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्च्हान मिळत असल्याचे सांगितले.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अर्चणा बावीकर यांनी उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले.

       बाभळगांव ग्रामपंचायतीकडून बचत गटाच्या माध्यमातुन डाळ मील सुरु करणाऱ्या नवउद्योजक महिलांचाही सत्कार करण्यात आला.

          या कार्यक्रमासाठी आयसीआयसीआय फाउंडेशनचे समन्वयक राहुल परिहार व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपसरपंच विजयश्री वाघमारे यांनी व अनिता वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

 
Top