धाराशिव / प्रतिनिधी-

 प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर क्रुषी क्षेत्र मोठ्या प्रमानात विकसीत झाले असले तरी अनेक भागातील शेतकर्यांकडुन पारंपारीक पध्दतीने शेती केली जाते. शेतकर्यांनी त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पारंपारीक शेतीला बगल देत शाश्वत रेशीम शेती आत्मसात करने आवश्यक असल्याचे मत उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) महेंद्रकुमार कांबळे यांनी व्यक्त केले.

तहसील कार्यालयाच्या वतीने धाराशिव  येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात धाराशिव तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व पोकरा अंतर्गत मंजूर  रेशीम /  तुती नर्सरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) महेंद्रकुमार कांबळे बोलत होते. व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी डॅा योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी, गटविकास अधिकारी संतोष नलावडे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी आरती वाकुरे, क्षेत्रीय सहायक बाळासाहेब सुर्यवंशी आदिंसह विविध विभागातील अधिकारी, कर्र्मचारी, रोपवाटिकाधारक व शेतकर्यांची प्रमुख उपस्तिथी होती.

बदलत्या हवामानामुळे शेतीतील नुकसान टाळण्यासह शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टीने पारंपरिक शेतीला बगल देत रेशीम शेती कडे शेतकर्यांचा कल वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाभरात सध्या महारेशीम अभियान राबविले जात असून त्यानुषंगाने जिल्ह्यातून १०००० एकर लागवडीचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. उस्मानाबाद तालुक्यातून तहसीलदार गणेश माळी यांनी आजतागायत ६२० लाभार्थी शेतकऱ्यांना रेशीम लागवड प्रस्तावातील प्रशासकीय मंजुरी दिली आहे. 

तालुक्यातील अधिकाधिक महिला बचत गट व शेतकर्यांनी रेशीम / तुती रोपवाटीका केली जावे त्यानुषंगाने धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांना रोपवाटीकेचे  प्रशिक्षण मंगळवारी देण्यात आले. प्रशिक्षणात आधुनिक रेशीम लागवड, तुती च्या नवीन विकसित जाती, नर्सरी साठी आवश्यक जागा, खत, रोप लागवडीच्या पद्धती यासह इतर आवश्यक माहिती बाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले, तसेच रेशीम शेतीतील यशस्वी शेतकऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन करत अतिवृष्टी काळातही रेशीम शेतीमधुन घेतलेल्या उत्पन्नाविषयी अनुभव सांगत शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रेशीम शेतीचे महत्व यावेळी सांगितले.

सध्या रोपवाटिका करन्यासाठी हंगाम संपत आला असल्याने तालुक्यातील जास्तीत जास्त महिला बचत गट व वैयक्तिक शेतकरी यांनी तुती रोपवाटिका करण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.

 
Top