धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचा लेखी तालुकानिहाय अहवाल जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी विभागीय आयुक्ताकडे दिला आहे. धाराशिव जिल्ह्यातील 2 हजार 472 शेतकऱ्यांचे 1 हजार 525 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले असल्याचे कळविले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व इतर यंत्रणा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली होती. 

 धाराशिव जिल्ह्यात जिरायत 1 हजार 92 हेक्टर, 360 हेक्टर बागायत व 73 हेक्टर फळबागचे नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक कळंब तालुक्यात 1 हजार 628 हेक्टर नुकसान, धाराशिव 174 तर उमरगा तालुक्यात 644 हेक्टर नुकसान आहे. धाराशिव जिल्ह्यात 17, 18 व 19 एप्रिल या तीन दिवशी पाऊस  व गारपीट झाली. शेतीपिकाची प्रत्यक्ष पाहणी करुन तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या पाहणीनंतर नुकसानीचा अहवाल सादर केला आहे.

 
Top