धाराशिव / प्रतिनिधी-

    धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रत्यक्ष शेतकरी कर्जदारास कर्ज व व्याजाची रक्कम भरूनच कर्ज प्रकरण नवे-जुने करावे अशा प्रकारच्या विविध कार्यकारी सोसायटी व बँकेने शेतकऱ्यांना तगादा लावला आहे. यापूर्वी फक्त कागदपत्राने कर्ज प्रकरण नवे-जुने व्हायचे मात्र यावर्षी पूर्ण रक्कम भरूनच कर्ज प्रकरण नवे- जुने करण्याचे बँकेने सुरू केलेले आहे सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून त्यातच गारपिटीने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व एकाएकी एवढी रक्कम शेतकऱ्यांना भरणे अवघड असुन शेतक-यांने रक्कम भरुन कर्ज प्रकरण दाखल केले तर कर्ज परत मिळणार याची बँक शास्वती देत नाही. तरी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती, सदर विषयात लक्ष घालून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त व्याज भरून घेऊ शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण नवे- जुने करण्याच्या सूचना संबंधित कार्यालयास देण्यात याव्या अन्यथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा धाराशिवच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा किसान मोर्चा धाराशिवच्या वतीने करण्यात आला.

 यावेळी भाजपा किसान मोर्चा पुर्व मराठवाडा संपर्क प्रममुख रामदास कोळगे,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम, युवराज नळे, बालाजी गावडे,  नवनाथ कांबळे, मोहन खापरे, काका शेळके, संतोष आगलावे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थीत होते.

 
Top