कळंब / प्रतिनिधी-
हनुमान मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना व कलश रोहन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन शनिवार तारीख 11 ते सोमवार तारीख 13 या कालावधीमध्ये होणार आहे.
याचा लाभ घेण्याचे आवाहन साधू बुवा मंदिर विश्वस्त मंडळ व समस्ती गावकरी मंडळ पिंपळगाव डोळा यांनी केले आहे या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये ह.भ.प.आप्पा महाराज जावळे हळदगाव,व ह. भ .प .बापू देव जोशी महाराज मोहा यांचे हरिकीर्तन होणार असून सोमवार ता. तेरा रोजी कलश मिरवणूक होऊन हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी ह .भ. प .दत्ता महाराज आंबिरकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन नारायण आप्पा दशवंत श्री. साधुबुवा मंदिर विश्वस्त मंडळ व समस्त गावकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.