राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष दुधगावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

धाराशिव / प्रतिनिधी-

: कांद्याला प्रती क्वींटल एक हजार रुपये अनुदान द्यावे व नाफेडकडून कांदा व हरभरा शासकीय खरेदी केंद्र त्वरीत चालू करण्यात यावीत, येत्या चार दिवसात मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गान तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी यांना सोमवारी (दि.) दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, मागील दोन वर्षापासून सततचा पाउस व अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच सन २०२२ चा खरीप सोयाबीन विमा व सततच्या पावसाचे २२२ कोटीचे अनुदान अद्यापही शासनाने घोषणा करुन शेतकºयांना मिळालेले नाही. परंतू रब्बी हंगामातील कांदा व हरभरा हे शेतकऱ्यांचे नगदी पीक तयार झालेले असताना दोन्हीही पिकांचे बाजारभाव कोलमडले आहेत. प्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी दुर्देवाने शेतकऱ्यांना कांदा व हरभरा मातीमोल भावाने विकावा लागत आहे. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दराने कांदा विकला जात आहे. त्याचप्रमाणे हरभरा रुपये ४४०० ते ४५०० क्विंटल दराने विकला जात असून अगोदरच संकटात असलेला शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. तरी कांद्याला प्रती क्विटल  एक हजार रुपयाचे अनुदान, हरभरा व कांदा शासकीय खरेदी केंद्राकडून येत्या चार दिवसात खरेदी करण्यास सुरवात करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दुधगावकर यांनी निवेदनात दिला आहे.


 
Top