कळंब / प्रतिनिधी-

  एकीकडे शासन गरिबांना मोफत गहू व तांदूळ देण्याचा निर्णय घेत आहे. तर दुसरीकडे ते ज्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याचे वितरण करण्यात येते. ती यंत्रणा संबंधित लाभार्थ्यांना ते धान्य वाटप करतात परंतु शहरासह प्रत्तेक खेडेगावात ते लाभार्थी रेशन दुकानदार यांच्या कडून माल घेऊन जातात आणि ते भंगारवाले यांना विकतात  भंगारवाले गावोगावी जाऊन लाउडस्पिकर वर गल्लोगल्लीत अलाउशिंग करुन तो माल गोळा करत आहेत याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत व ते भंगारवाले त्याची काळ्या बाजारात परस्पर विक्री करून लाखो रुपयांची काळी माया जमवत आहेत  रेशन व्यवस्थेंतर्गत वितरित होणारा १० लाख रुपयांचा ११६ पोती तांदूळ कळंब येथील मार्केट यार्डातील एका आडत दुकानातून काळ्या मार्गाने विक्री होत असलेला प्रकार कळंब विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी चव्हाट्यावर आणला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्यासाठी दि.१५ मार्च रोजी कळंब उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांना कळंब शहरातील मार्केट यार्ड भागातील तुळजाभवानी ट्रेडींग कंपनी ॲंड आडत दुकानासमोर शासनाचा वितरणाचा तांदुळ अनाधिकृतरित्या विक्री करण्यासाठी ठेवण्यात आला असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्यामुळे त्या ठिकाणी कळंब उपविभागाचे पथक व कळंब पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दि.१५ मार्च रोजी १०.०२ वाजता छापा मारला असता त्या ठिकाणी रेशनच्या तादुळाची विना परवाना ११६ पोती तांदूळ विक्री करण्यासाठी जवळ बाळगल्याचे मिळून आले. त्यावेळी कळंब येथील इंदिरानगर भागातील शंकर रावण सावंत तेथे उपस्थित होते. तर त्या गोडाऊनमध्ये पाहणी केले असता रेशन तांदुळ ४० पोते व गोडाऊन बाहेर टॅम्पो एमएच- २४ एयु- ००४१ मध्ये रेशन तांदुळाचे ७६ पोते असे एकूण ११६ पोते व एक आयशर टॅम्पो मिळून आले. या तांदळाची १० लाख ४ हजार ४०० रुपये तर ३० हजार रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ४० लाख ४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

शासनाचा रेशन वितरण व्यवस्थेमार्फत वाटप करण्यासाठी आणलेला तांदूळ अवैधरित्या विक्री करणाऱ्या शंकर सावंत यांच्या विरोधात कळम पोलीस ठाण्यात कलम ३.७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गायकवाड, सपोनि पाटील, पोउपनि पुजरवाड, सपाफी अतकरे, मपोना प्रतिभा मते, पोना सादीक शेख, शिवाजी राऊत, पोको नवनाथ खांडेकर, श्रीकांत भांगे, राजु मुळे यांनी कामगिरी केली आहे तरी या प्रकरणी रेशन दुकानदारांचा कसलाही संबंध येत नाही असे दिसून येत आहे  परंतू शासन गरिबांना मोफत धान्य देत आहे  परंतु तो तांदूळ भंगारवाले गावोगावी फिरून लाभार्थी यांच्या कडून गहु, तांदूळ गोळा करून भंगारवाले काळ्या बाजारात विक्री करून लाखो रुपयांची माया कमवित आहेत याचे व्हिडीओ शासनापर्यंत पोहचले आहेत यावर कोणत्याच अधिकारी यांनी आजपर्यंत  पाऊल उचलले नाही हि बाब अंत्यत गंभिर आहे यावर अधिकारी किंवा गावपातळीवर बंदोबस्त केला असता तर हि वेळ आली नसती यापुढे तरी या प्रकरणी आळा घालावा अशी मागणी काही ग्रामस्था मधुन होत आहे. 

 
Top