तुळजापूर/ प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टिपीओ विभागा मार्फत महाविद्यालयातील तिस-या व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी  सॉफ्ट स्किल सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते. 

 सर्वप्रथम महाविद्यालयातर्फे टिपीओ प्रमुख प्रा. पी.ए. हंगरगेकर यांनी सेमिनारचे प्रमुख वक्ते तसेच ACE Softskill solutions तर्फे प्रा. एम. एस. देशपांडे यांचे स्वागत केले व महाविद्यालयाच्या प्रबंधक सौ. सुजाता कोळी यांनी प्रा. रोहन कुरी यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. देशपांडे यांनी ज्ञान, कौशल्य व दृष्टीकोन हया तीन बाबींचे सखोल मार्गदर्शन केले व जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी या तीन बाबी विद्यार्थ्यांनी योग्य प्रमाणामध्ये स्वतःमध्ये अंगीकारल्या व सतत प्रयत्न केले तर यशस्वी होण्यापासून कुणीही परावृत्त करू शकणार नाही असे सांगीतले. प्रा. कुरी यांनी मुलाखती  मध्ये यशस्वी होण्यासाठीची कौशल्ये विशद केली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डि. व्ही. शिंदे व प्रा. एस. एस. शिंदे यांनी व सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले, टिपीओ विभागामार्फत सर्वाचे आभार मानले. 


 
Top