धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन  श्री हनुमान मंदिर, एकुरका, ता.कळंब येथे   करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात एकुरका व परिसरातील सर्व वयोगटातील ७००  महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन   सरपंच शरद भिसे  यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे ते.प.ट्रस्टचे जेष्ट निश्वस्त श्री आशेक भाऊ शिंदे व विजेंद्र आण्णा चव्हाण, संचज घोगरे, बाळासाहेब यादव, राजेंद्र खोत, किशोर भिसे, सुनिल यादव, अमोल यादव, लहु धुमाळ, धनंजय गुंड इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ विजय राऊत, डॉ. तेजस राणे, डॉ. प्रतिक राठोड, डॉ.रिया तिवारी, डॉ.नंम्रता गर्जे, डॉ.व्यकटेश पाटील यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे नामदेव शेळके, विनोद ओव्हळ, अमिन सय्यद, पवन वाघमारे,  निशिकांत लोकरे, सचिन व्हटकर, रवी शिंदे, व मंगरुळ केंद्राच्या आशा कार्यकर्ता वैशाली पवार, निता बरकते, मुक्ता खोत, सविता भोरे यांनी परीश्रम घेतले.


 
Top