धाराशिव / प्रतिनिधी-

वडार समाजाच्या कल्याणासाठी स्वतंत्र पै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापित करून अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद केल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील वडार समाजाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या केलेल्या सत्काराचा प्रतिनिधिक स्वरूपात स्वीकार केला.

  सर्व सामाजिक घटकांचा विचार करून सादर केलेला हा अर्थसंकल्प असल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक समाजाचा व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

 याप्रसंगी  अप्पा पवार, श्रावण पवार, पाराजी देवकर, विठ्ठल चौगुले, संजय पवार, लाला माने, चंद्रकांत पवार,  तुकाराम देवकर,  मछिंद्र पवार, संजय बाबा पवार, नागेश पवार, प्रभाकर देवकर,  गोविंद देवकर,  राम देवकर,  नामदेव देवकर,  लक्ष्मण देवकर,  बबलू माने,  राजू देवकर, महेश पवार,  सुरज देवकर, नितीन गुंजाळ,  युवराज देवकर,  रोहित देवकर, पदाधिकारी व वडार समाज बांधव उपस्थित होते.


 
Top