उमरगा/ प्रतिनिधी-

देशात वंचीत समाज मोठया संख्येने बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत.ओबीसींनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती प्रमान मानून विचारांचे परिवर्तन करत २२ प्रतिज्ञा घेऊन धम्मात येत आहेत.त्याला विरोध करण्यासाठी भाजप शासित राज्यात धर्मांतर विरोधी कायदा केला जात असून ही धम्मक्रांती ची लाट कोणीही थोपवू शकत नाही असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचें नातू भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांनी केले.

तालुक्यातील कराळी येथे रविवारी (दि.२६) रोजी दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट भन्ते सुमंगल यांच्या वतीने आयोजित केलेल्या धम्मपरिषदेस संबोधित करतांना ते बोलत होते.परिषदेच्या अध्यक्ष स्थानी महू मध्यप्रदेश येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या भीमजन्मभूमी बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष डॉ. सुमेधबोधी होते तर धम्मपीठावर भंते आनंद थेरो,धम्मदीप एचथेरो,असंघोष थेरो, भदंत आर्याजी रूपनंदा, शिलरत्न महाथेरो,धम्मबोधी,एस. राहुल, संघबोधी,नागसेन बोधी,  धम्मसार,सुमेध नागसेन, सारीपुत्त,महाविरो,सुमंगल, धम्मदीप,उपाली,अमरज्योती,

जिल्हा परिषद समाजकल्याण चे माजी सभापती हरिष डावरे,दिग्विजय शिंदे,श्रीहरी कांबळे(चेले) प्रा.श्रीकांत गायकवाड, बसवकल्यानं येथील धनराज तांडपल्ली,धम्मचारी प्रज्ञाजित,धम्मचारी धम्मभूषण,हणमंत कांबळे,आदींची उपस्थिती होती.

पुढें बोलतांना डॉ.आंबेडकर म्हणाले की,जगात रक्तरंजित क्रांत्या झाल्या आहेत. मात्र भारत देशात रक्ताचा एकही थेंब न सांडत रक्तविहिन धम्मक्रांती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली असून जगात ही घटना सुवर्णाक्षराने लिहिली आहे.आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र आम्हीं क्रांतिकारक महापुरुषांचें वारसदार असून आगामी काळात मोठी धम्मक्रांती घडुवून आचरणशील बौद्ध अनुयायी घडविणार आहोत. या करिता भन्तेजीच्या सहकार्याची गरज आहे असे ते म्हणाले.

धम्मपरिषदेच्या पहिल्या सत्रात भिक्षूनी आर्याजी रूपनंदा म्हणाल्या की धम्म म्हणजे दुसरे तिसरे कांही नसून माणसाने माणसाशी माणसा सम वागणे यालाच धम्म म्हणतात शील सदाचार युक्त जीवन जगून सत्कर्म करून आपले जीवन सुखी बनविण्यासाठी धम्म आहे. काया वाचा मनाची शुद्धी करून इतरांना प्रेरणादायी जीवन जगावे हा धम्म आहे तर अंधश्रद्धा बाळगणे हा अधम्म आहे प्राण्यांची हत्या करणे हा अधम्म आहे तर पंचशीलासोबत अष्ट शील उपोसताचे पालन करून ब्रम्हचर्याचे पालन करत श्रद्धा, शील, दान, त्याग भावनेतून आचरण करणे हा सधम्म आहे असे त्या म्हणाल्या अध्यक्षीय समारोप डॉ सुमेधबोधी महाथेरो यांनी केला धम्मपरिषद आयोजित करण्याचा उद्धेश विशद केला. जगात धम्म झपाट्याने वाढत असून धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी बौद्ध अनुयायांची जबाबदारी मोठी असल्याचे ते म्हणाले या वेळी धम्म परिषदेत विविध ठराव घेण्यात आले आणि साधू काराच्या जयजयकार करीत ते पास करण्यात आले.भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अडँ दीपक निकाळजे यांचे भाषण झाले.धम्मपरिषदे साठी ट्रस्टचे उपाध्यक्ष एम.एस.सरपे, कोशाध्यक्ष कैलास शिंदे,संचालक दिलीप भालेराव,संतोष जाधव, आनंत कांबळे, अडँ. माधव ढोणे, कराळी गांवचे सरपंच सुभाष राठोड, डी. टी.कांबळे, बालाजी गायकवाड, संतोष सुरवसे,चंद्रकांत कांबळे, प्रा ए.सी.गायकवाड, आदींनी परिश्रम घेतले. प्रारंभी भीमगीताचा कार्यक्रम घेण्यात आला.धम्मपरिषदेचें सूत्रसंचालन धम्ममित्र जी. एल. कांबळे यांनी केले. प्रस्तावित भन्ते सुमंगल यांनी केले. तर आभार एम.एस.सरपे यांनी मानले परिषदेस तालुका परिसरातील बौद्ध उपासक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 
Top