तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील  आरळी (ब्रु)  येथे राष्ट्रीय  विज्ञान दिनानिमित्ताने जिल्हा परिषद  प्राथमिक शाळेत विविध वैज्ञानिक आणि हातचलाखीचे प्रयोगाचे शिक्षक  चंद्रकांत  उळेकर यांनी सादरीकरण केले. 

यामध्ये  काडीपेटी न घेता मंत्राने आरती पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. गुलाबी रंगाची करणी..भानामती ओळखणे.., हात लावेल ती वस्तू गोड करणे.. , प्रश्न चिन्ह बोटाच्या टोकावर स्थिर करणे.., बिनवातीचा दिवा पाण्याने पेटविणे..,लंगर सोडविणे.., बंद चिठ्ठीमधील मजकूर आंतरज्ञानाने ओळखणे.., तांब्यात भूत बंद करणे..,हातरूमालला जाळ लावून तोच हातरूमाल जसाच्या तसा दाखविणे..., मोडलेली काडी मंत्राने जोडणे..असे विविध वैज्ञानिक आणि हातचलाखीचे प्रयोग करुन दाखविण्यात आले... यात  येथे चमत्कार सादरीकरणात शाळेतील २५०[ विद्यार्थ्यांना सहभागातून वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला.


 
Top