परंडा / प्रतिनिधी-

 मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा  रहास होत आहे .पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे त्यामुळे पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे . देशातील चिमण्यांची संख्या वरचेवर कमी होत चाललेले आहे पर्यावरणाचा समतोल, अन्नसाखळी यांच्या असमतोलामुळे तसेच चिमणी विषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जागतिक चिमणी हा दिवस साजरा केला जातो असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले . महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला .  प्राणशास्त्री विभाग प्रमुख डॉ अतुल हुंबे आणि प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . यावेळी प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते चिमण्यांना पाणी पिण्यासाठी झाडांना पाणी पात्र ठेवण्यात आले व महाविद्यालयाच्या संपूर्ण प्रांगणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांना राहण्यासाठी घरटे झाडाना लावण्यात आले . याप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने,दैनिक भास्कर या वृत्तपत्राचे पत्रकार हरून शेख, प्राध्यापक डॉ सचिन चव्हाण प्रयोगशाळा सहाय्यक जयवंत देशमुख तसेच महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉक्टर अतुल हुंबे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार डॉ शहाजी चंदनशिवे यांनी मानले .

 
Top