तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तुळजाभवानी महाविद्यालयात डॉ. सुयोग अमृतराव यांनी वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयात संशोधन करत असताना संशोधनाची गरज, संशोधनासाठी विषय निवड,  संशोधनातील वेगवेगळे टप्पे, संशोधनाच्या पद्धती, नविन शैक्षणिक धोरण व संशोधन या  विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. अमृतराव यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाबरोबरच भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योजकतेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी कल्पकतेतून विकास साधण्यावर भर द्यावा. नवनविन कल्पना निवडून त्यांच्या माध्यमातून उद्योजक बनावे. तरूणांनी धाडशी बनून उद्योजक होण्यासाठी शासनाकडून सुरू केलेल्या स्टार्टअप, मेक इन इंडिया, मुद्रालोण सारख्या योजनांचा लाभ घ्यावा.

 या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनेर सर यांच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस. एम मणेर  यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. निलेश एकदंते यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रा. डॉ काळे एन् बी ,वाणिज्य विभाग प्रमुख, डॉ.  प्रा. साळुंके सर, प्रा. एकदंते सर, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ. साळुंके डी. जी. यांनी आभार मानले.

 
Top