परंडा / प्रतिनिधी - 

ग्लोबल वार्मिंग ही आजच्या काळातील ज्वलंत आणि भयावह व पर्यावरण समस्या आहे.ज्या वेगाने माणूस दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे तितकाच तो निसर्गाला हानी पोहोचवत आहे असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रोफेसर डॉ प्रशांत दिक्षित यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय पर्यावरण संवर्धन या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती.त्यावेळी त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना केले . 

    यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते . तर आयक्यूएसी चेअरमन डॉ महेशकुमार माने, गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे , सायन्स फोरमचे चेअरमन डॉ सचिन चव्हाण उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने यांनी केले . अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांनी केला त्यांनी सांगितले की पर्यावरण समस्या ही अतिशय ज्वलंत समस्या आहे. संस्था सचिव संजय निंबाळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद या ठिकाणी हजारो झाडे लावली आणि त्या झाडांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली त्यामुळे संजय निंबाळकर हे एक आदर्श सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख  झाली आहे.त्यांचा आदर्श प्रत्येक नागरिकांनी घेतला पाहिजे.यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ अतुल हुंबे यांनी केला.शेवटी कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे यांनी मानले.कार्यक्रमासाठी वनस्पतीशास्त्री विभाग प्रमुख डॉ प्रकाश सरवदे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ अतुल हुंबे प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांची उपस्थिती होती तर या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top