धाराशिव / प्रतिनिधी-

राज्यातील गुटखा, पान मसाला पुर्णपणे विक्रीस खुला करण्यात यावा, अशी मागणी   ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी मागणी मान्य न झाल्यास येत्या १५ दिवसात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंच्या संख्येने निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर  जिल्हाधिकारी  ऑल इंडिया पॅंथर सेनेचे  जिल्हाध्यक्ष धनंजय हुंबे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कसबे ,जिल्हा प्रवक्ते समीर तांबोळी  यांच्या सह्या आहेत. 


 
Top