धाराशिव / प्रतिनिधी-

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा अळणी च्या वतीने अळणी गावात जनजागृती 

 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कृषी विभाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी च्य्या वतीने गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.

 शेवटी ग्रामपंचायत कार्यालयात गावातील लोकांना पौष्टिक आहाराबाबत व आपला आहार समतोल असला पाहिजे व आपण सर्वांनी नियमित व्यायाम केला पाहिजे या विषयी  मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी  व सरपंच प्रमोद काका वीर यांनी मार्गदर्शन केले ,या वेळी कृषी सहायक दादासाहेब जगताप ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शाम लावांड , शाळा समितीचे अध्यक्ष विजय नांदे यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते ,दादासाहेब जगताप यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली

 
Top