तुळजापूर/ प्रतिनिधी-

  धाराशिव नावाच्या विरोधात चालू असलेले आंदोलन प्रशासनाने तात्काळ थांबविण्याची मागणी हिंदुराष्ट्र सेनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन  देवुन केली  मागणी.

 जिल्ह्याचे नाव धाराशिव असे अधिकृतरित्या करण्यात आले आहे व हा शासनाचा निर्णय आहे. धाराशिव नाव झाले या निर्णयाचे संबंध राष्ट्रभक्तांनी स्वागत केले आहे. जर हा निर्णय अन्यायकारक वाटत असेल तर मा. न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडली पाहिजे परंतु जिल्हाचे नाव धाराशिव झाल्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय समोर धाराशिव नावाच्या विरोधातील समूहाने आंदोलन सुरू केले आहे. यामुळे जिल्ह्यातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे व यामुळे धाराशिव जिल्ह्यात तेढ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धाराशिव नावाच्या विरोधात चालू असलेले आंदोलन तात्काळ थांबविण्यासाठी हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने  जिल्हाधिकारी व   पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे. हे निवेदन हिंदू राष्ट्र सेनेचे परिक्षित सांळुके यांनी दिले.


 
Top