कळंब/ प्रतिनिधी-

परिचारिका यांच्या हातात,  रुग्णाचे जीवन असते, सेवा भाव  वृतीने काम करून, रुग्णाची सेवा करा, हे मोठे पुण्याचे काम आहे,अशी अपेक्षा प्रा. साहेबराव बोंदर यांनी व्यक्त केली.ते रेणुका फाउंडेशन च्या कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्ष स्थानी शरद जाधवर हे होते.

विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मात व्हावा, या उद्देशाने रेणूका फाउंडेशन कळंब तर्फे आदर्श शिक्षक' पुरस्कार दिला जातो.  या वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्रीमती. दिपाली जाधव मॅडम याना  आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या  सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्यात आले.स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी शरद जाधावर, प्राचार्या सौ. राणी जाधवर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी विद्यार्थ्यांना मेणबत्ती हातात देवून शपथ देण्यात आली.

 पुरस्कारांचे वितरण संस्थापक अध्यक्ष शरद  जाधवर, मा. नगर सेवक सतीश  टोणगे , पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, प्रा.  साहेबराव बोंदर, प्राचार्य  सौ.राणी जाधवर , श्रीमती उगलमुगले मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. 

 शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी रेणूका फाउंडेशन तर्फे शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. तसेच दर वर्षी प्रमणी आदर्श विद्यार्थी सूडके भाग्यश्री,  सरिता शिंदे यांना ही पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 
Top