तेर / प्रतिनिधी-

 धाराशिव तालुक्यातील तेर येथील हजरत खाजा सुलेमान रहे.अलै.यांच्या उरूसास उत्साहात प्रारंभ झाला. 

दरबार गल्लीतून डोक्यावर संदल घेऊन उत्साहात संदल मिरवणुकीस प्रारंभ झाला.शेर ए.हिंद ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संदल मिरवणूकीचा शुभारंभ धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंदराजे  निंबाळकर यांच्या डोक्यावर संदल देऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला.यावेळी माजी सरपंच महादेव खटावकर, तेर   सोसायटीचे व्हा.चेअरमन रतन नाईकवाडी ,अप्पासाहेब चौगुले , मंगेश पांगारकर,अविनाश आगाशे, बाबुराव नाईकवाडी, अविनाश इंगळे,अमोल कसबे ,रणधीर सलगर  ,रियाज कबीर ,मकसूद काझी, फैसल काझी, धनंजय आंधळे ,खालेद काझी ,बापू नाईकवाडी आदी उपस्थित होते .

तर बबलू मोमीन युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संदल मिरवणुकीचा शुभारंभ भा.ज.पा.चे.जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या डोक्यावर संदल देऊन करण्यात आला.यावेळी सरपंच दिदी काळे , उपसरपंच श्रीमंत फंड , जि.प.चे.माजी उपाध्यक्ष  शिवाजीराव  नाईकवाडी ,पद्माकर फंड,तेर सोसायटीचे चेअरमन सतिष कदम, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य  जुनेद मोमीन,   माजी सरपंच  नवनाथ नाईकवाडी,मज्जित मनियार,  विठ्ठल लामतुरे,विलास रसाळ ,जयेश कदम , अजीत कदम ,नवनाथ पसारे, इर्शाद मुलांनी, अभिमान रसाळ ,  शहाबाज मुलानी,संजय लोमटे, किशोर काळे,अरशाद मुलानी, जहांगीर कोरबू, रविराज चौगुले  आदी उपस्थित होते.

 
Top