धाराशिव / प्रतिनिधी-

 रूग्णांची आर्थिक फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा देऊन त्यांची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी  उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे याला धाराशिव पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी डॉ शेंडगे यांना परराज्यातून अटक करण्यात आली.

 डॉ शेंडगे सापडत नसल्यास त्यांना सीआरपीसी कलम 82 व 83 अंतर्गत फरार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करण्याचा विषय औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक के एम प्रसन्ना यांच्या पत्रकार परिषदेमध्ये झाला होता.  त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत शेंडगे यांना अटक केली.12 ऑक्टोबर 2021 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास गेली 16 महिन्यापासून डॉ शेंडगे फरार होते.

   डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह डाॅ.शेंडगे यांच्या विरोधात  गुन्हा नोंद झाला होता.   


 
Top