धाराशिव  / प्रतिनिधी-

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव व नगर पालिका धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने २९-३०-३१ मार्च रोजी राज्यस्तरीय गंगाधर करंडक एकांकिका स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे.   या स्पर्धेसाठी पुणे-मुंबईसह राज्यातील गाजलेले ३० नाट्य संघ येणार आहेत, अशी माहिती नाट्य परिषदचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी पत्रकार परिषदेत मध्ये दिली. 

बुधवार दि. १५ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस प्रसिध्द कवी राजेंद्र आत्रे उपस्थित होते. पत्रकारांना अधिक माहिती देताना शिंगाडे यांनी सांगितले की, या स्पर्धेनिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य मंडळाचे विजय कदम, सविता मापकर,  मोहन जोशी येणार आहेत. या एकांकिका स्पर्धेनिमित्त धाराशिव येणाऱ्या सर्वांची नाट्य संघाकडून राहण्याची, भोजनाची, नाष्टयाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी २५०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. विजेत्या प्रथम, द्वितीय ,तृतीय नाट्य संघास ५१ हजार, ३१ हजार, २१ हजार या प्रमाणे रोख रक्कम व पारितोषीक देण्यात येणार आहे.

केवळ नाट्य चळवळ पुढे चालत रहावी, यासाठी हा प्रयत्न असल्याचे ही शिंगाडे यांनी सांगितले. 

 
Top