धाराशिव / प्रतिनिधी-

विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र यांनी घेतलेल्या 2022-23 या आर्थिक वर्षातील  धाराशिव पोलीस दलाची तपासणीचा समारोप सिरमोनियल परेडने झाला. सदर परेडचे नेतृत्व जिल्हा पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांनी केले. सिरमोनियल परेड मध्ये 18 अधिकारी व 240 जवान सहभागी झाले होते.

 दि. 01.03.2023 ते 04.03.2023 या कालावधीत वार्षिक तपासणी दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मलिकार्जुन प्रसन्ना यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब, पो. स्टे. ढोकी, पो. स्टे. आनंदनगर, उपविभागीय अधिकारी शहर विभाग तसेच पोलीस अधिक्षक कार्यालय व विविध शाखाना भेटी देवून पोलीस दलाचा कामगिरीचा आढावा घेतला.

   पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी मागील आठ महिन्यापासून पदभार सांभळल्यानंतर धाराशिव जिल्हयात गुन्हेगारीवर नियत्रंण, अवैध धंद्यावर परिणामकारक कारवाई, गुन्हे दोषसिध्दीचे प्रमाण, मुद्देमाल निर्गतीचे प्रमाण वाढविले आहे.

 विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मलिकार्जुन प्रसन्ना यांनी  पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,एम रमेश यांचे एकंदरीत  कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले आहे.


 
Top