वाशी / प्रतिनिधी-

वाशी येथील अजिंक्य विद्यालय च्या  विद्यार्थ्यांचा दि.3 व 4 फेब्रुवारी रोजी रात्री विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी चिमुकल्यानी विविध हिंदी, मराठी गीतावर डान्स करून ग्रामस्थांची मने जिंकली.

       छत्रपती शिवाजी महाराज व विद्येची देवता सरस्वती  यांच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. अजिंक्य शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. भारत बन साहेब, गटशिक्षणाधिकारी गटशिक्षण कार्यालय वाशी  श्री. आसराजी कावळे सर  केंद्रप्रमुख वाशी केंद्र,  यांचे शुभहस्ते करण्यात आले  तसेच सदाशिव भाऊ जगताप अध्यक्ष अजिंक्य क्रीडा मंडळ,  नगरसेविका शामल  कवडे , रागिनी चेडे  अध्यक्षा माता पालक संघ, बाळासाहेब आवताडे अध्यक्ष शिक्षक पालक संघ तुकाराम वीर, नगरसेविका वंदना कवडे. प्रशांत ढेपे,  ऍड. गणेश सुकाळे, राजेंद्र गरड, शाळेचे संस्थापक . एस एल पवार , मुख्याध्यापक लक्ष्मीकांत , मुख्याध्यापिका  मनीषा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.   या कार्यक्रमात नर्सरी, एलकेजी, युकेजी,  पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.  यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक,  ऐतिहासिक, गीते,  बोधपर नाटिका, मनोरंजनात्मक गीते सादर केली. यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, खंडेरायाची ,  महाराष्ट्र दर्शन गीत,  गोरा कुंभार भक्ती गीत,  विठ्ठल गीत,  सादर करून  प्रेक्षकांसमोर महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी क्षीरसागर, स्वाती  शिंदे मनीषा नाईकवाडे जयश्री  लावंड यांनी तर प्रास्ताविक  स्वप्नाली सांडसे व  शिवाजी दळवे यांनी केले.  वर्षभरातील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  संस्थापक एस एल पवार सर  प्रमुख पाहुणे  व उपस्थित पालकांच्या हस्ते करण्यात आला.  मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार यांनी सर्व पालकांना  कार्यक्रमाची रूपरेषा सांगत शांतपणे पाहून सहकार्य  करण्याची विनंती केली.  शेवटी स्वाती खाडे व मुख्याध्यापिका मनीषा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.   ग्रामस्थांनीही कार्यक्रमास चांगला  प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.


 
Top