परंडा/ प्रतिनिधी - 

तालुक्यातील ढगपिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी शुक्रवार दि.१० रोजी ग्रामपंचायत ची विशेष सभा घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परंडा तहसीलचे मंडळ अधिकारी आबासाहेब सुरवसे यांनी काम पाहिले. 

सरपंच पदासाठी सौ.गुंफाताई लहु मासाळ यांनी नामनिर्देशन दाखल केले.त्यांच्या समवेत ग्रामसेवक श्रीराम खरात, ग्रा.पं सदस्य श्री राजेंद्र परबत , श्रीम.चंपावती जाधव उपस्थित होते. 

   यावेळी सरपंच पदासाठी एकही अर्ज न आल्यामुळे सौ.गुंफाताई लहु मासाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

यावेळी मा.सरपंच डाॅ.नवनाथ वाघमोडे, मा. सरपंच बप्पाजी जाधव, भाजपा तालुका उपाध्यक्ष रवि गरड, शहाजी सोलंकर, वैजिनाथ आबा हिवरे,शहाजी गरड, सुरेश येवारे,नितीन गरड, लहु मासाळ, राजेंद्र कुलकर्णी, विकास सोसायटी चेअरमन रमेश गरड,बळीराम हिवरे,ज्ञानदेव वाघमोडे,बापू करळे,अभिमान बारसकर,पोलीस पाटील हरिदास हावळे उपस्थित होते. 

 
Top