धाराशिव/ प्रतिनिधी - 

अथक परिश्रमाने धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. मात्र राष्ट्रीय विज्ञान आयोगाच्या एका पथकाने नुकतीच अचानक या वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. या भेटीत कांही विभागात पायाभूत सुविधा कमी असल्याने या त्रुटीची पुर्तता ७ दिवसात करा, असे राष्ट्रीय आयुिर्वज्ञानच्या पथकाने सांगितले आहे. याबाबत सदर माहिती वैद्यकीय महाविद्यालयाने राज्य सरकारला कळवली आहे, त्यामुळे राज्य सरकार टिचींग फॅक्टीची पुर्तता सोमवार दि.१३ मार्च किंवा १४ मार्चच्या दरम्यान अधिकृत ऑर्डर काढून करणार आहे.

धाराशिव शहरात सुरू झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाचे १०० प्रवेश झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन प्रशासनाने दुसऱ्या वर्षीसाठीच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी तयारी सुरू केली होती. त्या अनुशंगाने राष्ट्रीय आयुिर्वज्ञान आयोगाच्या पथकाने नुकतीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. त्यात त्यांना टिचींग फॅकल्टीमध्ये ३७ टक्के प्रमाणात त्रुटी आढळली. निवासी डॉक्टरांच्या बाबतीत ६१ टक्के इतकी कमतरता असल्याचा शेरा या समितीने मारला आहे. या शिवाय मायक्रोबॉयोलॉजी, अनॉटॉमी, पॅथॉलॉजी अशा एकुन पाच विभागात पायाभूमत सुविधा कमी असल्याचे पथकाने कळविले आहे. 

याबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पथकाने ६ मार्च रोजी वैद्यकीय महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावून ७ दिवसात त्याची पुर्तता करावी, असे कळविले आहे. 

सोमवारी किंवा मंगळवारी ऑर्डर निघणार 

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे पथक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता अचानक वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाल्याने या त्रूटी दिसून आल्याचे सागण्यात आले आहे. वास्तवीक िटंचीक फॅकल्टीमध्ये पुर्ण स्टॉफ भरलेला असून त्या दिवशी स्टॉफ मधील कांही जण उशीरा आले.  सोलापूर, कांही लातूर येथून ये-जा करीत असल्यामुळे ते सकाळी ९ वाजता महाविद्यालयामध्ये उपस्थित नव्हते पथकाने काढलेल्या त्रूटीची माहिती राज्य सरकारला कळविण्यात आली आहे. मंत्रालयातून सोमवार दि. १३ मार्च किंवा १४ मार्च रोजी टिंचीग फॅकल्टीमधील अनेकांच्या अिधकृत ऑर्डर निघणार असल्याचे सांगण्यात आले व इतर पायाभूत सुविधांची पुर्तता करण्यात आली असल्याचे सांगितले. 

 
Top