धाराशिव / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सालाबादाप्रमाने याही वर्षी तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.सकाळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यास दुग्ध अभिषेक मा.नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मा.श्री.लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,मा.श्री नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह शिवप्रेमी शिवसैनिक युवा सैनिक यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व पुजन करून अभिवादन केले. तसेच शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रदिप साळुंखे,नगर परिषदेचे गटनेते सोमनाथ गुरव,युवा सेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,मा.नगराध्यक्ष दत्ता बंडगर,नगर सेवक बाळासाहेब काकडे,रवि वाघमारे,पंकज पाटील,गणेश खोचरे,राणा बनसोडे,रवि कोरे आळणीकर,नितिन शेरखाने, दउप शहरप्रमुख बंडू आदरकर, विजय ढोणे, बापु साळुंके, सुरेश गवळी,बाळासाहेब दंडनाईक,दिनेश बंडगर,अजय नाईकवाडी, नवज्योत शिंगाडे, आदित्य हंबीरे, प्रविण केजकर,अभि कदम,महेश उपासे, कृष्णा साळुंखे, सह्याद्री राजेनिंबाळकर,गणेश राजेनिंबाळकर,चेतन वाठवडे,महेश लिमये,नाना घाडगे,दिपक जाधव,बाबु पडवळ,अमित उंबरे,कलिम कुरेशी,सतिश लोंढे, सुनिल गायकवाड, हनुमंत देवकते,आश्रुबा मुंडे,पिंटू अंबेकर,गणेश साळुंखे,प्रशांत जगताप,निलेश शिंदे,अजित बाकले,मंगेश काटे, जगदिश शिंदे,नरसिंह मिटकरी संदिप शिंदे,अक्षय जोगदंड, अमित जगधने हनुमंत यादव,राकेश कचरे,प्रदिप साळुंखे यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top