तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील चंद्रकांत नरळे या शेतकऱ्याच्या एक नंबर कांद्यासह भाव मिळत नसल्याने  तीन एकर कांद्यावर नांगर फिरवला . जगातील अनेक देशात कांद्याचे भाव गगणाला पोहचले असताना महाराष्ट्रात माञ कसे गडगडत कसे असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. 

 तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक कांदा गेली दहा वर्षापासुन आपसिंगा शिवारात पिकवला जातो.  माञ लाखो खर्च करुन कांदा पिकवला त्याचे  आता पैसे होणार म्हटलं कि भाव गडगडला  त्यामुळे  आजपर्यंतची मेहनत रोप लावणे पाणी देणे हा खर्च तर वायपटच गेला मात्र खिशात पैसा नसल्याने रोजगार यांना पैसा कुठून द्यायचा असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना  पडला आहे.कांदाला भाव कमी  काढणी जादा पैसे जात असल्याने   त्यातून कांद्याला तर भावच नाही म्हणून रोटर वाल्याच्या पाठीमागे तीन दिवस होतो माझा कांदा तीन एकर आहे. रोटर करून दे मात्र आज मुहूर्त लागला आणि सरकारने वेळ आनली एक नंबर कांदा असलेला तीन एकर कांद्यावर शेतकरी चंद्रकांत नरुळे यांनी  रोटर ( नांगर ) फिरवला  आता रोटर वाल्याचे पैसे कुठून द्यायचे ह्या चिंतेत असलेले शेतकरी चंद्रकांत नरळे यांना पडला आहे. 

 

 
Top