धाराशिव / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि दलित चळवळीचे नेते व समाजसेवक कैलासवासी यशपाल सरवदे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात दोन मिनिटे स्तब्ध उभा राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

       यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला  यावेळी प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की, यशपाल सरवदे यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. ते महाविद्यालयाचे विद्यार्थी असतानाच त्यांच्यामध्ये समाजसेवेची बीजे रोवली गेली आणि सामान्य कुटुंबातील मुलगा समाजासाठी असामान्य काम करू लागला. यशपाल सरवदे यांच्यासारखे निष्कलंक व्यक्तिमत्व दलित चळवळीतून गेल्याने दलित चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा भावना  त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. सरवदे यांच्या कुटुंबांना महाविद्यालयाकडून शोक संदेश देऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले.

    यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top