धाराशिव / प्रतिनिधी-

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात वाणिज्य विभाग आणि घोडके -पाटील अँड असोसिएट यांच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करारा अंतर्गत एकदिवसीय व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी सीए गोरोबा घोडके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले की, सध्याच्या काळामध्ये सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण घटत जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अकाउंट आणि टॅक्सेशन क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी शोधून स्वतः आत्मनिर्भर व्हावे. त्यामुळे देशातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.

  यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. बालाजी नगरे यांनी केले, सूत्रसंचलन डॉ.अमर निंबाळकर यांनी केले तर आभार डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी मानले.  सदर कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top