धाराशिव / प्रतिनिधी-

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा शासकीय रूग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली. महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय महाविद्यालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

 धिकारी डॉ.रफिक अन्सारी, माता बालसंगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इस्माईल मुल्ला, वैद्यकीय अधिकारी दीपक मेंढेकर, डॉ.सुशील चव्हाण, डॉ.सचिन गायकवाड, डॉ. विवेक होळे, डॉ. बेटकर, मेट्रन श्रीमजी सुमित्रा गोरे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 यावेळी  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रफिक अन्सारी म्हणाले की, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणू चा शोध लावला. त्यांच्या स्मृतिनिमित्त 24 मार्च हा जागतिक क्षयरोग  दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचे घोषवाक्य यस, वी कॅन एन्ड टीबी असे आहे. प्रधानमंत्री  नरेंद्र मोदीनी आवाहन केले आहे की, जागतिक पातळीवर सन 2030 पर्यंत क्षयरोग निमूर्लनाचे उद्दिष्ट असले तरी भारतात 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन करायचे आहे. त्यानुसार  जिल्ह्यात जास्तीत जास्त संशयित रूग्णांचा शोध घेऊन त्याचे निदान करुन उपचार करण्यात येत आहेत. राज्यस्तरावरून जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा प्रमाणे  प्रति लाख  दोन हजाराच्या पुढे संशयित रूग्ण शोधून निदान झालेल्या रूग्णांवर उपचार सुरू केलेले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 केंद्रामार्फत क्षयरोगाचे निदान केले जात असून जिल्हा क्षयरोग केंद्रासह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.  प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत सन्माननीय राष्ट्रपतींनी केलेल्या आवाहनानुसार उपचाराखालील १२९ क्षयरूग्णांना सहा महिन्यापर्यंतचे फूड बास्केट तयार करुन देण्यात आलेले आहे.  क्षयरोग निर्मूलनाच्या या लढ्यात समाजातील दानशूर व्यक्तींनी निक्षे मित्र म्हणून उपचाराखालील क्षय रुग्णांना दरमहा अतिरिक्त पोषण आहार देऊन मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.

 यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून निघालेली ही रॅली काळा मारुती चौक, ताजमहल टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शहर पोलीस ठाणे या मार्गावरुन जिल्हा क्षयरोग केंद्र येथे विसर्जित करण्यात आली. रॅलीमध्ये जिल्हा क्षयरोग कार्यालयातील कर्मचारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

 
Top