पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार 

धाराशिव / प्रतिनिधी-

  पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक  एम. रमेश गेल्या सहा महिन्यात राबविण्यात आलेल्या अभियानातुन अनैतिक देह व्यापार करणाऱ्या इसमा विरुध्द उस्मानाबाद जिल्ह्यात एकुण 12 कारवाई करण्यात आल्या असुन या कारवायामधुन 33 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. त्याबद्दल पोलिस अिधकारी, अंमलदार यांचा सत्कार करण्यात आला. 

  एक्सोडस रोड इंडिया फाऊंडेशन यांच्या वतीने पोलीस मुख्यालय येथे  धाराशिव पोलीसांनी गेल्या सहा महिन्यात राबविण्यात आलेल्या अभियानातुन अनैतिक देह व्यापार करणाऱ्या इसमा विरुध्द उस्मानाबाद जिल्ह्यात एकुण 12 कारवाई करण्यात आल्या असुन या कारवायामधुन 33 पिडीत महिलांची सुटका केली असल्याने एक्सोडस रोड इंडिया फाऊंडेशन या संस्थेने पोलीसांनी केलेल्या कारवाई बाबत तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रोत्साहानपर पोलीसांना जरकिंग व रोप मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच धाराशिव जिल्ह्यात अनैतिक देह व्यापार करणाऱ्या इसमांची माहिती  मिळाल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे असे आवाहन मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी जनतेस केले आहे.

 सदर कार्यक्रमास  सहायक पोलीस अधीक्षक  एम. रमेश, एक्सोडस रोड इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष रामलिंग काबंळे व सदस्य ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष’ (ए.एच.टी. सेल) चे प्रभारी पोनि  के.एस. पटेल, पोलीस अंमलदार हे उपस्थितीत होते.


 
Top