तुळजापूर / प्रतिनिधी-

ओमान जमीर शेख या चिमुरडयाने  रमजान महिन्यातील पवित्र असा आपला पहिला रोजा अर्थात उपवास पुर्ण केला.

मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना दि. 24 एप्रिलपासून सुरू झाला आहे. या पवित्र रमजान रोजा अर्थात उपवासास धार्मिक महत्व असून मुस्लीम बांधवाकडून रोजाची कडक धारणा केली जाते. पहाटे सहेरी केल्यानंतर दिवसभर कांहीही न खाता व पाण्याचा एक थेंबही न पिता अल्लाहची आठवण करून रोजा पुर्ण केला जातो. या पवित्र रमजानच्या महिन्यात  30 दिवस अनेक जण अगदी धार्मिकतेने रोजा करतात. मुस्लीम धर्मामध्ये पाच तत्वापैकी रोजाला विशेष महत्व दिले जाते. 

कमान वेस, तुळजापूर येथील ओमान शेख या 9 वर्षाच्या चिमुरडयाने शनिवारी (दि.25) रमजान महिन्यातील पवित्र असा आपला पहिला रोजा अर्थात उपवास  पुर्ण केला. ओमान शेख हा लिटल प्लावर्स मराठी प्राथमिक शाळा तुळजापूर येथे इयत्ता 4 थी च्या वर्गात शिक्षण घेत आहे.

सध्या कडक उन्हाळा आहे, अशा कडक उन्हाळ्यात देखील लहान वयातच ओमान याने पहिला रोजा धरून यशस्वीपणे पुर्ण केल्याने शेख परिवाराने ओमानला पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या. ओमानचे वडील जमीर असदुल्ला शेख, आई नसरीन शेख, आजोबा इब्राहीम, आजी बिबीजान, फेरोजा, काका अमानुल्ला, आत्या साहेरा मौजन, जाकेरा, शाकेरा, ताहेरा शेख, चुलती रब्बाना, शबाना, भाऊ नजीब, सैफ, कैफ, रिहान, बहीण अनम, माहेरा, मामा इस्माईल शेख, हाजी शेख, फयाज मौजन, आयाज मौजन, वसीम मौजन, इलियास मौजन, सादीक, सय्यद, तय्यबअली, इम्रान आदीं कुटूंबियासह नातेवाईकांनी ओमान यास शुभेच्छा देऊन त्याचे कौतुक केले.

 
Top