नळदुर्ग / प्रतिनिधी-

   जळकोट येथे आठवडी बाजारात पेट्रोलिंग  करणेकामी  पोउपनि पवनकुमार अंधारे, सोबत पोलीस हावलदार  शिंदे पोलीस अंमलदार- दांडेकर,सगर, बारकुल असे जळकोट कडे जात असताना मुर्टा पाटीजवळ आलो असता जळकोट कडून एक लाल रंगाची स्विप्ट डिझायर (क्र एमएच 25 ए एस 9589 ) ही संश्यितरित्या रोडने जातानी दिसल्याने त्यास थांबवून चौकशी केली असता सदर कार चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- रोहीत संजय राठोड, (वय 20 वर्षे, ) रा. शास्त्री चौक नळदुर्ग असे सांगून त्याच्या कडे अधीक चौकशी केली असता त्यांने उडवा उडवीची उत्‌तर दिल्याने पथकाने सदर कारची पाहणी केली. त्यामध्ये 14 पांढऱ्या रंगाचे पोत्यामध्ये गुटखा एकुण 34 पांढऱ्या बॅगमध्ये मिळून आल्याने महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या असलेली पुडके असा एकुण 1,96,000 ₹ किंमतीचा माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन मालासह कार सह असा एकुण 8,96,000 ₹. माल जप्त करुन ताब्यात घेतला.

 तसेच  दुसऱ्या घटनेत  पेट्रोलिंग करत असताना इटकळ दुरक्षेत्र हद्दीतील बीट भागात आयशार टेम्पो (क्र. केए 32 एए 2000) संश्यितरित्या रोडने जातानी दिसल्याने त्यास थांबवून चौकशी केली असता सदर टेम्पो चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- फारुख अहमद जावेद अन्सारी, (वय 35 वर्षे,) रा. मेहबुब नगर गुलबर्गा कर्नाटक असे सांगून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांने उडवा उडवीची उत्‌तर  दिल्याने पथकाने सदर टेम्पोची पाहणी केली. त्यामध्ये गुटखा सदृश्य पदार्थ SGR 2000 नावाचा गुटखा एकुण 34 पांढऱ्या बॅगमध्ये मिळून आल्याने. पथकाने खात्री केली असता त्या पोत्यांत असणाऱ्या छोट्या पिशव्यांत महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या असलेली पुडके असा एकुण 10,81,200 ₹ किंमतीचा माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन मालासह आयशार टेम्पो असा एकुण 30, 81, 200 ₹. माल जप्त करुन ताब्यात घेतला. जप्त मालाची तपासणी होण्यासाठी पोलीसांनी अन्न व औषध प्रशासनास कळवले असता श्रीमती- नसरीन तनवीर मुजावर यांनी जप्त पदार्थ हा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी श्रीमती- मुजावर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद कार व टेम्पो  चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम-  272, 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26 (2) (I), 27 (2)  सह वाचन अधिनिय   क 30(2) (अ) सहवाचन अधि क 2, 3, 4 वि.बं. दं. कलम 59 आंतर्गत 133/2023 व 134/2023  असे दोन गुन्हे नळदुर्ग पो.ठा. येथे   नोंदवला आहे.

 सदरची कामगीरी ही  पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक   नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पो.ठा. चे सपोनि- गोरे, सपोनि- श्री. मोटे, पोउपनि-   अंधारे पोलीस अंमलदार- यांच्या पथकाने केली.


 
Top