धाराशिव / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा विभाग अध्यक्ष तथा माजी केंद्रीय यमंत्री जयसिंगरावजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी निवडनुक रणनीती व संघटन बांधनी संदर्भात कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे व जिल्हाध्यक्ष प्रा .सुरेश दाजी बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना जयसिंगराव गायकवाड म्हणाले की कार्यकर्त्यांनी घर घर चलो अभियान, वन बूथ टेन युथ ही संकल्पना अधिकाधिक प्रभावीपणे राबविली पाहिजे. पक्षाचा कार्यकर्ता हा सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. पक्ष संघटन वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरुन पक्ष वाढेल असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी देखील उपस्थितीना मार्गदर्शन केले.

  यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील- दुधगावकर,डॅा. प्रतापसिंह पाटील, संजय निंबाळकर, मसूद  शेख,  नितीन बागल,  प्रा.तुषार वाघमारे, संजय कांबळे,नंदकुमार गवारे,  अयाझ शेख, श्रीधर भवर, श्याम घोगरे, धैर्यशील पाटील,  रंजना भोजने, विशाल शिंगाडे,   असद खान पठाण,  सुनिल शेंडगे, सतीश घोडेराव,  अशोक जाधव,वाजिद पठाण,  मनिषा पाटील, अमोल पाटील,  अनिकेत पाटील,   योगेश सोंन्ने पाटील,  बालाजी शिंदे,जयंत देशमुख,दशरथ माने,  इस्माइल शेख,बाबा मुजावर, भीमा हगारे,  इंद्रजित शिंदे,  दत्यात्रय पवार,  प्रवीण लाडूळकर, भाऊसाहेब ननवरे, अप्सरा पठाण,  ज्योति माळाळे,सलमा सौदागर,अनवर शेख,पंकज भोसले,बिलाल तांबोळी,अरुण माने तसेच सदरील बैठकीस जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी/कार्यकारणी, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष व कार्याध्यक्ष, शहर अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष तसेच प्रमुख नेते पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित उपस्थित होते .


 
Top