नळदुर्ग / प्रतिनिधी-

महिलांच्या अंगातील कला गुणांना वाव मिळावा तसेच महिलांना त्यांचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठीच आपण जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांनी त्यांच्या वतीने आयोजित केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व "सुर नवा ध्यास नवा" या संगीत गीतांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना म्हटले.

  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या वतीने दि.१९ मार्च रोजी नळदुर्ग येथे जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन खास महिलांसाठी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व "सुर नवा ध्यास नवा" या संगीत गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे, माजी नगरसेवक शफीभाई शेख, कमलाकर चव्हाण,शरीफ शेख,रुकनोद्दीन शेख, दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्राताई मुळे आदीजन उपस्थित होते. या कार्यक्रमात अशोक जगदाळे यांच्या वतीने सुवर्णा वऱ्हाडे, सीमा कासार,आशा गायकवाड, सहशिक्षिका वंदना चौधरी, सरस्वती बेले,अनिता औटे, स्वाती बताले,कल्पना शिंदे,प्रेमल भोसले,महानंदा स्वामी, नुसरतबी शेख,अनुसया बिराजदार,लताबाई पाटील, भामाबाई जाधव,अर्चना गायकवाड, शोभा कोकणे,अनिता पांचाळ,लक्ष्मी इंगोले, गीता काटकर,तुळसाबाई शिंदे,मैना कांबळे,मंगल गायकवाड व अनिता काटवटे या कर्तृत्ववान व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या या महिलांचा भव्य सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.यावेळी डॉ. स्वाती शिंदे, सुभद्राताई मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक गीता कासार यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.वनिता चव्हाण यांनी केले तर आभार सौ.रेखा वऱ्हाडे यांनी मानले.या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन हे महिलांनी केले होते.   सत्काराच्या कार्यक्रमानंतर सोलापुर येथील "सुर नवा ध्यास नवा" या संगीत गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित महिलांनी नृत्य करण्याबरोबरच गवळण, भावगीत, भक्तीगीत जुने व नवीन हिंदी मराठी चित्रपटांच्या गीतांचा मनमुराद आनंद लुटला. असे कार्यक्रम वारंवार व्हावेत अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी यावेळी व्यक्त केल्या.यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या.  हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वनिता चव्हाण, उमा जाधव, मनिषा काशिद,जोशीला कासार, शोभा ठाकुर,डॉ. प्रतिभा नरवडे,स्नेहलता काटकर,गीता कासार यांच्यासह नितीन कासार, अमृत पुदाले,दीपक काशिद यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top