धाराशिव / प्रतिनिधी-

 शहरातील रसूलपुरा या भागामध्ये अब्दुल रसूल बाबा या दर्गाह परिसरामध्ये लग्न करण्यासाठी शादीखान्याची अत्यंत आवश्यकता होती. मात्र जागा असताना देखील लग्न सभामंडप बांधकाम करण्यासाठी निधी नसल्यामुळे अडचण येत होती. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक भान असलेले व सर्वसामान्यांचे आमदार म्हणून सर्वांच्या मदतीला पुढे धावून येत असलेल्या आ. कैलास पाटील यांनी दि.६ मार्च रोजी १५ लाख रुपये निधीच्या मंजुरीचे पत्र दिले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची लग्न करण्यासाठी होत असलेली व होणारी अडचण कायमस्वरूपी दूर होण्यास मोलाची मदत होणार आहे.

  उस्मानाबाद शहरातील रसुलपुरा भागात आ.कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व मुख्याधिकारी वसुधा फड यांनी भेट देऊन पाहणी केली होती. पाहणी केल्यानंतर शादीखाना बांधकाम करण्यासाठी १५ लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करीत निधी मंजूरीचे पत्र आ. पाटील यांच्या निवासस्थानी गेलेल्या शिष्ट मंडळास दिले. यावेळी  अब्दुल रसूल बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अहमद कुरेशी, शौकत शेख, बिलाल तांबोळी, जुबेर शेख, रुधिर गायकवाड, मकबुल टकारी, करीम कुरेशी, बाबा कुरेशी, आयाज पठाण, असलम कागदे, नवनाथ डोंगरे, रणजीत एडके, महादेव थोरात, लियाकत कुरेशी, नवज्योत शिंगाडे, नागनाथ मगर, अजमत शेख, कलीम कुरेशी, अहेमद कुरेशी आदीसह नागरिक उपस्थित होते.


 
Top