धाराशिव / प्रतिनिधी-

 भारतीय जनता पार्टी धाराशिव आयोजित साजरी करण्यात येणाऱ्या भारतरत्न विश्वरत्न, परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सव समितीपदी भाजपचे नेते मा.आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी कांबळे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी साहिल माने,

सचिव संजय जेटीबोर, कोषाध्यक्ष अमर इंगळे,कार्याध्यक्ष बाळा इंगळे, सहकार्याध्यक्ष उमेश माने, मिरवणूक प्रमुख अमोलराजे निंबाळकर, उमेश सिरसाट, प्रविण वाघमारे,पवन गायकवाड, दत्ता गायकवाड, सिद्धांत बनसोड, यांची निवड झाल्याबद्दल भाजपा भवन (प्रतिष्ठान भवन) धाराशिव येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या तर्फे निवड करण्यात आलेल्या कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला. यावेळी समिती आयोजक प्रवीण सिरसाठे, पांडुरंग आण्णा पवार, सागर दंडणाईक व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top