धाराशिव / प्रतिनिधी-

 वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान हा उपक्रम दि. 08 मार्च 2023 पासून संपूर्ण राज्यभर आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने धाराशिव  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने Breast Clinic OPD  चे उदघाटन सुशिलादेवी सांळुखे अध्यापक महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ.सुलभा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. स्तन कर्करोग जनजागृती व उपचारांतर्गत सुरु करण्यात आलेल्या Breast Clinic OPD  ही दर बुधवारी दुपारी 12:00 ते 2:00 वेळेत असणार आहे. स्तन कर्करोगाचे प्रमाण स्त्रियांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच स्तन कर्करोगाचे योग्य वेळी निदान झाल्यास योग्य उपचारा नंतर पूर्णपणे बरा होतो.त्यामुळे या अभियानांतर्गत  Self Breast Examination आणि Clinical Breast Examination याचे प्रशिक्षण तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने विविध शाळा, सार्वजनिक संस्था, कार्यालये आदी ठिकाणी जनजागृती मोहिम राबविली जाईल.उदघाटन झाल्यानंतर  Breast Clinic OPD मध्ये महिलांची तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ञ डॉक्टर्स व जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर्स व NCD च्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली आणि पुढील कार्यकाळतही करण्यात येईल. जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमांचा लाभ  दर बुधवारी दुपारी  12  ते 2 या वेळेत घ्यावा, असे अवाहन करण्यात आले.

 हा कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या मार्फत घेण्यात आला. या कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा वसंतराव दोमकुंडवार, प्रमुख पाहुणे डॉ. सुलभा देशमुख व श्री. प्रशांत पाटील, तसेच डॉ. उदयकुमार पाध्ये,डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. सचिन देशमुख,डॉ.शतंनु पाटील, डॉ. सुधिर शिंदे, डॉ.बालाजी समुद्रे, डॉ. किरण देशमुख, अधिसेविका सौ. सुमित्रा गोरे, अधिपरिचारीका वर्ग व इतर कर्मचारी  उपस्थित होते.

 
Top