धाराशिव / प्रतिनिधी-

गेल्या  वर्षभरात जिल्हयात खूनाच्या गुन्ह्यात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रस्त्यावरील अपघातात ४५५ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्हयासाठी स्वतंत्र वाहतुक विभाग असणार आहे. तर धाराशिव शहरासाठीपण स्वतंत्र वाहतूक विभाग राहणार आहे, अशी मािहती विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना यांनी पत्रकारांशी बातचीत करताना दिली. 

धाराशिव जिल्हयाच्या पोलिस विभागाची वार्षीक तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पाेलिस महानिरीक्षक के.एम.प्रसन्ना यांनी गेल्या कांही दिवसापासून जिल्हयाचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी शुक्रवार दि. ३ मार्च रोजी सायंकाळी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत व इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते. के.एम.प्रसन्ना यांनी जिल्हयात रस्त्याच्या अपघतात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वाहनांच्या तपासण्या करणे, नियमाप्रमाणे वाहने चालविण्यासाठी आग्रह धरणे, अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. पोलिस यंत्रणेविषयी लोकांचे मत चांगले यावे, त्यावर अिधक भर देण्यात येईल,सध्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ३० टक्के ते ६० ते ७० टक्क्यावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करने, वाहन चोरी, तपास प्रमाण वाढविणे, मोबाईल चोरी गेल्यास तत्काळ गुन्हा दाखल करने, दामिनी पथक अिधक सक्षम करने, सायबर शाखा अिधक सक्षम करने आदीवर आपण भर देणार असून याचा रिजल्ट कांही महिन्यात दिसून येईल असेही प्रसान्ना यांनी सांगितले.  यावेळी पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी वृक्ष लागवड, पोलिस कर्मचारी यांच्यासाठी राबविलेल्या विविध योजना, गुन्हेगारीला आळा, गुन्हा सिध्दीचे उकल प्रमाण वाढल्याने प्रसन्ना यांनी अतुल कुलकर्णी यांचे कौतुक केले. 

 
Top