परंडा / प्रतिनिधी-

 विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्कारही जपले पाहिजेत तरच  चांगले नागरिक म्हणून त्यांची समाजात ओळख निर्माण होईल असे प्रतिपादन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी संत मीरा पब्लिक स्कूल परांडा येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना केले. ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

     संत मीरा पब्लिक स्कूल परांडा येथे इयत्ता 12 वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संतोष भांडवलकर हे उपस्थित होते .तर व्यासपीठावर जीशान मुजावर, माही ठाकूर, प्रसाद दनाने तसेच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

       यावेळी दिशान मुजावर, निखिल पाटील, क्षितिज चौरे, ओंकार पखाले, नायजील शेख, प्रीतम दास, समृद्धी मोरे, नेहा रोहिते, आनम शेख, मधुरा विटकर यांनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्ष समारोप प्राचार्य संतोष भांडवलकर यांनी केला ते अध्यक्ष समारोपामध्ये म्हणाले की या संस्थेचे संस्थापक डॉ प्रतापसिंह पाटील साहेब यांनी या शाळेच्या विकासासाठी वैयक्तिक लक्ष घालून या शाळेचे वटवृक्षांमध्ये रूपांतर केले आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून  दिल्या आहेत. या शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सहशिक्षक विकास सुरवसे, अनुराधा गव्हाळे, दादासाहेब गिरवले, अश्विनी मोरे, सुनील चव्हाण, विकास शेळके, प्रवीण कांबिलकर, अनिल कांबळे यांनी सहकार्य केले.

  इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी 3000 रुपयाची  घडी शाळेस भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेरे यांनी केले तर समर्थ  सूर्यवंशी या विद्यार्थिनीने आभार मानले.


 
Top