धाराशिव / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद नगर पालिका हददीतील स्टेडीयमचे बाजुस अनेक समाजातील कुटुंबे सालसन 1955 पासून वास्तव्यास आहेत त्यांचे पैकी बऱ्याच जणांची नावे भोगवटादार म्हणुन नगर पालिकेचे रेकॉर्डला तर कांहीची नावे मालमत्ता पत्रकाध्ये अनाधिक्रत कब्जेदार म्हणुन 1977 साली नोंदवलेली आहेत. असे आसताना नगर पालिका उस्मानाबाद यांनी शोभा विनोद बग्गा व राजीव विनोद बग्गा यांना दिनांक 10/2/2023 रोजी अचानकपणे त्यांचे असलेले रहाते घरे अतिक्रमण मध्ये आहे ते सात दिवसाच्या आत काढण्याबाबत नोटिस दिली होती, त्यामुळे कित्येक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांस बेघर व्हावे लागणार म्हणून शोभा विनोद बग्गा व राजीव विनोद बग्गा यांनी उस्मानाबाद येथील दिवाणी न्यायालयात मा. जिल्हाधिकारी साहेब तसेच नगरपरिषद उस्मानाबाद यांच्या विरोधात अँड. सतिश एस. शेटकर यांच्यामार्फत घोषणेचा व मनाई हुकुम मिळण्याचा दावा दिनांक 9/3/2023 रोजी दाखल केला, ई-फाइलिंग सुरू झाल्यामुळे सदरचा दावा तात्काळ नोंदवुन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच दिनांक 13/3/2023 रोजी दाव्याची तात्काळ सुनावणी दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर उस्मानाबाद मा.श्री. बालाजी य. चौधरी साहेब यांचे समोर सकाळी 11:15 वाजता झाली आणि त्याच क्षणी मा. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व कागदोपत्री पुराव्याचे अवलोकन करुन पुढील आदेशापर्यंत 'जैसे थे' चे आदेश देत प्रकरणी २४ मार्च रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. विशेष म्हणजे नगर पालिकेचे कर्मचारी दिनाक 13/3/2023 रोजी सकाळी 11:20 वाजता अतिक्रमण काढणेसाठी जागेवरती आलेली होते. केवळ मा. न्यायालयाचा जैसे थे चा आदेश आल्याने नगर पालिकेचे कर्मचाऱ्यांना विना कारवाई परत जावे लागले. सदर प्रकरणाची सुनावणी व तात्काळ पक्षकारांना मिळालेला दिलासा हे केवळ ई फायलिंग मुळेच झाले अशी भावना वकिल व पक्षकार यांनी व्यक्ती केली.


 
Top