धाराशिव / प्रतिनिधी-   

 शासकीय विश्राम गृह धाराशिव या ठिकाणी स्वजनहित सामाजिक बहुउद्देशीय संस्था धाराशिव यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही संविधानकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जयंती समितीची कार्यकारिणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आल्या.

 अध्यक्ष गणेश एडके, उपाध्यक्ष सलमान शेख, कार्याध्यक्ष हिम्मत भोसले, कोषाध्यक्ष जगदीश जोशी, प्रसिद्धीप्रमुख शंकर मोरे, सहप्रसिद्धीप्रमुख ओंकार देवकते, सहप्रसिद्धीप्रमुख आशिष यरकळ, सचिव आदित्यराज इंगळे यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या.   याप्रसंगी संस्थेचे सचिव सचिन लोंढे यांनी स्पर्धा घेण्यामागचा हेतू तसेच स्पर्धेची रूपरेषा याविषयीची माहिती दिली.

 या बैठकीसाठी पपिन भोसले, अंकुश पेठे, आनंद भालेराव, पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव, उमेश हिंगे, ज्ञानेश्वर सुळ, मुकेश शिंदे, निरंजन जगदाळे, बालाजी झेंडे, नवनाथ सोलंकर, राज नवले, आकाश शेंडगे, अरविंद देवकते, रणजीत वैरागे इ.सदस्य उपस्थित होते.


 
Top