उमरगा/ प्रतिनिधी-

 बचत गटातील महिलांनी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून स्वतः ची व कुटुंबाची प्रगती साधावी असे विचार नाबार्ड चे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री गोखले यांनी मुळज येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.             

 गुरूवार दि.16-03-2023 रोजी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक [नाबार्ड] व महिला आर्थिक विकास महामंडळ [माविम] धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसहाय्यता महिला बचत गट पदाधिकारी व सदस्य यांचे करिता नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम मौ. मुळज, ता. उमरगा, जि. धाराशिव येथे संपन्न झाले.या प्रशिक्षणाचे अयोजन ज्ञानदिप लोकसंचलित साधन केंद्र, उमरगा या कार्यालयामार्फत करण्यात आले होते.

 या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करुन चैतन्य गोखले [जिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड], सुमित कोथिंबीरे [संपर्क अधिकारी, प्रथम फाउंडेशन, किल्लारी] , किशोर टोंपे [व्यवस्थापक, ज्ञानदिप CMRC, उमरगा] व महादेवी माळी [सचिव,ज्ञानदिप CMRC, उमरगा] यांच्या शुभहस्ते करण्यात आले व इतनी शक्ती हमे देना दाता या प्रार्थनेने प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.        

यावेळी चैतन्य गोखले यांनी नाबार्ड ची कार्यप्रणाली, ग्राम विकासातील भुमिका तसेच महिलांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन प्रक्रिया उद्योग करावे व आर्थिक प्रगती करावी याबाबत मार्गदर्शन केले.  तसेच सुमित कोथिंबीरे यांनी सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी प्रथम फाउंडेशन किल्लारी येथील कौशल्य प्रशिक्षणात सहभागी होऊन विविध कौशल्य विषयक मोफत कोर्स करुन रोजगार मिळवावा असे यावेळी अवाहन केले.

 या प्रसंगी प्रशिक्षक किशोर टोंपे यांनी बचत गटाची दशसुञी, नेता म्हणजे काय ? नेतृत्वाचे प्रकार, नेत्याची भुमिका व जबाबदारी, नेत्याच्या अंगी कोणते गुण असावे, फिरते बदलते नेतृत्व  व बचत सदस्य ते अध्यक्ष हा प्रवास याबाबत पावर पाॕईंट प्रेझेंटेशन, विविध उदहारणे, गोष्टी, खेळ व प्रेरणादायी फिल्म यांच्या माध्यमातून चर्चात्मक प्रशिक्षण दिले.   या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुञसंचलन सखु सोनकांबळे [सहयोगिनी] यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन  ज्योती माने यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता जाधव, राणी बिराजदार, रुक्मीणी दंडगुले, सुमन सुतार, अनुसया कुंभार यांनी परिश्रम घेतले.


 
Top