धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव शहरातील सीसीटीव्ही बसविणे,कळंबच्या पोलीस निवासस्थानाचे बांधकाम, पोलीस पाटील मानधन वाढविणे, कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेस मंजुरी देऊन तात्काळ काम चालू कऱणे,रायगव्हाण प्रकल्प पाणी उपसा सिंचन योजना सूरु करणे, वडगाव औद्योगिक वसाहतीसाठी संपादित जमीनीचा मावेजा मिळावा,उजनी पाणी पुरवठा योजनेच्या सौर उर्जाप्रकल्पासाठी जमीन द्यावी, ढोकी व चार गावच्या पाणी पुरवठ्यासाठी सौर उर्जा प्रकल्प सूरु करावा अशा विविध मागण्या आमदार कैलास घाडगे पाटील यानी विधानसभेमध्ये (ता.16) रोजी मांडल्या.

यावेळी घाडगे पाटील म्हणाले की, धाराशिव शहरातील विविध चौकामध्ये सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे असलेले सीसी टीव्ही बसवण्याबाबत २०१९ मध्ये जिल्हा नियोजन समितीमधुन गृह विभागाला जवळपास दिड कोटी निधी उपलब्ध करुन दिला आहे. मात्र अदयापर्यंत शहरात सीसीटीव्ही बसवण्याबाबत निविदा प्रक्रिया राबविली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणुन दिले. कळंब येथील पोलीस निवासस्थानाचे बांधकाम करण्याची मागणीही त्यानी यावेळी मांडली. पोलीस पाटील संघटनेच्या मानधन वाढीसह विविध मागण्यासंबधीही आग्रही भुमिका मांडल्याचे आमदार घाडगे पाटील यानी म्हटले. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने ७०० कोटी रुपये मंजुर केले होते. मात्र त्याची निविदा प्रक्रिया प्रसिध्द  झालेली असुन ती शासन स्तरावर प्रलंबित आहे. शिवाय नव्या सरकारने निधी कमी दिला आहे. महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाबाबत गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर निम्न तेरणा प्रकल्पावरुन धाराशिव तालुक्यातील १९ गावांना शेतीसाठी पाणी येणार आहे. ही योजना दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रलंबीत असुन ही योजना तात्काळ राबवली जाण्याची गरज घाडगे पाटील यानी बोलुन दाखविली. लासरा ता. कळंब येथील रायगव्हाण  प्रकल्पामध्ये सात दशलक्ष लिटर पाणी उपसा सिंचन योजनेव्दारे टाकण्यासाठी मंजुरी मिळाली होती. त्याचे काम लवकर करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार घाडगे पाटील यानी दाखवुन दिली.

वडगाव (सि.) एमआयडीसीमध्ये २०१८ साली मंजुर झाली असुन संपादित क्षेत्राचा मावेजा देण्याबाबत मागणी लावुन धरली. यातील चांगल्या जमीनी संपादीत करुन घेतल्या मात्र ज्या उपयोगाच्या नाहीत त्या घेणार नसल्याची सरकारची भुमिका चुकीची असल्याचे त्यानी सांगितले. धाराशिव शहराच्या पाणी पुरवठयासाठी उजनी येथुन पाणी येते. त्यासाठी सौरउर्जा प्रकल्प मंजुर केला आहे, शासनाने जमीन उपलब्ध करुन न दिल्यामुळे ही योजना राबवण्यास अडचण आल्याचा मुद्दा उपस्थित करुन जमीन देण्याची कार्यवाही करण्याची मागणी आमदार घाडगे पाटील यानी केली. शिवाय ढोकी व चार गावच्या पाणी पुरवठयासाठी सौर उर्जा प्रकल्प मंजुर असुन त्याची कामे लवकर पुर्ण करण्याची मागणीही त्यानी सभागृहात लावुन धरली.


 
Top