मुंबई / प्रतिनिधी-

राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे ब्रांदा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पोला (मायटेक्स) एक लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. या एक्स्पोमध्ये कोट्यावधी रुपयांची ऊलाढाल झाली. महाराष्ट्र चेंबरने आयोजित केलेल्या एक्स्पोचे कौतुक नागरिकांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मायटेक्स एक्स्पोचा भव्य शानदार सोहळा संपन्न झाला होता. देशात गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ झाले आहे. राज्य सरकार उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक झाली. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले उद्घाटन प्रसंगी केले होते.

एक्स्पोच्या समारोपाप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्यातील व्यापार आणि उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. देशभरातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांना व्यापारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी मायटेक्स एक्स्पो ही एक पर्वणीच ठरली आहे. महाराष्ट्र चेंबरतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध उद्योगांतील सहभागींना एकाच छताखाली आणून ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते यंत्रसामग्रीपर्यंतचे प्रदर्शन पाहण्यास मिळाले. प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि विक्री करणे हे व्यापार प्रदर्शनाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी आणि रिटेल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठच लाभले. मायटेक्समुळे महाराष्ट्रातील उद्योग, व्यापाराचा प्रचार, प्रचार होऊन पोषण वातावरण निर्माण होऊन देशात एक नंबरचे राज्य बनविण्यात महत्वपूर्ण ठरेल.

राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी आणि रिटेल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठच मिळाले, अशा प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट दिलेल्या नागरिकांनी दिल्या. या एक्स्पोमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि राज्य, देश आणि परदेशातील व्यापारी उद्योजक सहभागी झाले.

महाराष्ट्र चेंबरचे चीफ पेट्रन कांतीलाल चोपडा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक प्रवीण राघवेंद्र, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, महाराष्ट्र चेंबरच्या विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, शुभांगी तिरोडकर, सुधाकर देशमुख, रवींद्र माणगावे, चंद्रशेखर पुनाळेकर, तनसुख झांबड, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे आदींनी संयोजन केले.


 
Top