धाराशिव / प्रतिनिधी-

  महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंच जिल्हा शाखा,  धाराशिवच्या वतीने मा. माध्यमिक चे शिक्षणाधिकारी  गजानन सुसर   व  प्राथमिकचे शिक्षणाधिकारी  सुधा साळुंखे यांना शाळेची वेळ (सकाळी 8 ते 12) अर्धवेळ करावी म्हणून निवेदन देण्यात आले.

सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढल्याने मुलांना दिवसभर शाळेत बसणे असह्य होत असून अनेक लहान मुले आजारी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे,

तसेच लातूर विभागीय शिक्षण आयुक्त मां श्री गणपत मोरे साहेब यांनी ही उन्हाची तीव्रता पाहता बीड , लातूर व धाराशिव येथील जिल्हा परिषदांना शाळा अर्धवेळ करावी असे आदेश दिले आहेत.

असे प्रदेश सचिव श्री पवन सूर्यवंशी यांनी सांगितले .

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळेची वेळ ही सकाळ सत्रात 8 ते 12 अशी करावी म्हणून माध्यमिक व प्राथमिक शिक्षणअधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनावर प्रदेश सचिव श्री पवन सुर्यवंशी सर, राज्य उपाध्यक्ष श्री शिवाजी खांडेकर पाटील, जिल्हाध्यक्ष श्री खुद्बुद्दिन शेख, जिल्हा सरचिटणीस दिपक हजारे सर यांच्या सह्या आहेत.


 
Top