धाराशिव / प्रतिनिधी-

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी चे मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांचा अळणी ग्रामपंचायत तर्फे त्यांच्या उत्कृष्ठ कर्या बद्दल आदर्श मुख्याध्यापक स्मृती चिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. तर श्रीमती सत्यशीला म्हेत्रे यांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

यावेळी   सरपंच प्रमोडकाका वीर , धनेश्वर ग्रुप चे प्रतापसिंह पाटील ,पोलीस निरीक्षक साबळे ,प्रदीप सस्ते ,  मोहन कुलकर्णी व उपसरपंच  गाडे ,संतोष चौगुले , धनाजी वीर ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,विविध कार्यकारी सोसायटी सर्व सदस्य ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्याम लाबंड ,पोलीस पाटील श्री माळी , शाळा समितीचे अध्यक्ष विजय नांदे व सर्व सदस्य गावातील हरिदास चौगुले , सदभावना ग्रुप  अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी , संदीप कोकाटे , सोपान कोरे, अक्षय कदम ,श्रीमती संजीवनी पौळ , लहू तोडकर,संजय थोडसरे ,ग्रामसेवक श्री माळी,रामराजे साळुंखे यांच्यासह  गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते

 
Top