तुळजापूर/ प्रतिनिधी-

टाटा सामाजिक विज्ञान संस्थान तुळजापूर येथे दिनांक 3 ते 6 मार्च 2023 रोजी राष्ट्रीय ग्रामीण युवा महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले आहे. युवकांना, हा युवक महोत्सव  विसंवादातून सुसंवादाकडे  जाणारा व त्या माध्यमातून ज्ञानाचा व सकारात्मक विचारांची अदान-प्रदान करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना व्यासपीठ निर्माण करून देणारा हा महोत्सव आहे.

देशातील महाराष्ट्र, हैद्राबाद, तामिळनाडू, केरळा अशा विविध राज्यातील जवळपास 29 कॉलेज मधील 300 विद्यार्थ्यानी क्रिकेट, व्हॉलीबॉल,फुटबॉल, कब्बडी, टेबल टेनिस, बुद्धिबळ, बॅडमिंटन, रांगोळी, पेंटिंग, डान्स, 

पारंपारिक गीत गायन, फॅशन शो, नृत्य या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.  त्याच बरोबर दिनांक 3 मार्च रोजी सकाळी विविध क्रीडा स्पर्धांचे उदघाटन होईल व सांयकाळी 6  वाजता जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंग, राज्यस्थान हे प्रमुख उदघाटक व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबीर व युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  यासाठी मार्गदर्शक म्हणून शेती व जल तज्ञ श्री. अनिकेतजी लोहिया हे उपस्थित राहणार आहेत.

दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  यामध्ये महिलांचे मानसिक आरोग्य, महिला सबलीकरण व महिला उद्योजकता विकास या विषयांवर व्याख्यान होणार आहेत.  सांयकाळी 6 वाजता विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.   तरी दैनंदिन महोत्सव कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्यांनी सहभाग घ्यावा,असे आव्हान महोत्सव समन्वयक रितेश साही, गणेश चादरे व सरोज भालाधारे यांनी आव्हान केले आहे.


 
Top