नळदुर्ग / प्रतिनिधी-

येथील रेणुका माता महिला बचत गटाच्या वतीने नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटावे म्हणून पथ नाट्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले, 

येथील बस स्थानक परिसरात व गर्दीच्या ठिकाणी रेणुका माता महिला बचत गटाच्या वतीने संत गाडगे महाराज यांचा व शासनाचा स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी या पथ नाट्याची निर्मिती करण्यात आली आहे, दरम्यान या वेळी शालेय विद्यार्थ्याचे स्वच्छता आभियानवर ही भाषणं घेण्यात आली, यावेळी विविध स्पर्धा ही घेण्यात आल्या. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ही करण्यात आले, स्वच्छते संदर्भात ठीक ठिकाणी भिंती रंगविणे, बॅनर बांधणे आदी कार्यक्रम ही बचत गटाच्या वतीने घेण्यात आले, या वेळी पालिकेचे प्रशासकीय अधिकारी अजय काकडे, बाबासाहेब बनसोडे, कपिल बनसोडे, राजू गायकवाड, मेजर लोखंडे आदी उपस्थित होते, दरम्यान रेणुका माता महिला बचत गटाकडून हा उपक्रम राबविलेमुळे बचत गटाचे आध्यक्षा सौ. कल्पणाताई गायकवाड, सचिव बायडा कांबळे, सदस्य देवाबई जाधव, रमाबाई बागडे, जिजाबाई गुरव, जनाबाई शिरोळे, संगीता गायकवाड, शारदाबाई घोडके, कमलाबाई घोडके, केशरबाई सोनवणे आदीचे शहरातून कौतुक केले जात आहे.


 
Top